Make your own free website on Tripod.com

      नमस्कार ! या संकेतस्थळावर आपलं हार्दिक स्वागत !

       मी अभिजीत दाते . शन्नांच्या शहरात अर्थात डोंबिवलीत राहतो . मी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या विषयात अभियंत्याची पदवी घेतली आहे . मी सध्या क्वािलटी िकआॅस्क टेक्नाॅलाँजीज् मध्ये साॅफ्टवेअर टेस्ट इंिजिनअर म्हणून कार्यरत आहे .

      माझ्याबद्दल सांगायचं तर मी एका टिपीकल चित्पावन कुटुंबात वाढलो . त्यामुळे माझ्यात खास चित्पावनी गुणधर्म ओघाने आलेच . शिवाय शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे मराठीबद्दल विशेष आत्मीयता आलीच .

       गिरीभ्रमण आणि वाचन हे माझे छंद . संगीत आणि साहित्य यांचीही आवड . मराठी भावगीत आणि नाट्यसंगीत तर अधिकच . मित्रांसोबत गप्पा मारत हिंडणे मी सर्वात जास्त एन्जॉय करतो . फ़ॅशनशी माझी जवळीक अशी नाहीच . वरण भात हा माझा आवडता मेनू . तसं मी चायनीज व पंजाबी खाणंही पसंद करतो .

       माझ्याशी मैत्री करायला तुम्हाला नक्कीच आवडेल .

      अजून काय सांगू ?

       भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर ,,

      जरा विसावू या वळणावर, या वळणावर....

   तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत ,

  अभिजीत दाते


href="http://www.esnips.com/web/abhijeetpoems">माझी किवता
href="http://abhijeet-date.tripod.com/lohgad.html">लोहगडची सफर